Notifikasi
Tidak ada notifikasi baru.
Penelusuran Trending (7 hari terakhir)

बुलढाणा एसपी कार्यालयात धामधूम! दोन एसपी एकाचवेळी कार्यालयात; खुर्चीसाठी संघर्ष?जिल्ह्यात पोलिस अधीक्षकपदावर पेच: विश्व पानसरे विरुद्ध निलेश तांबे!

बुलढाणा एसपी कार्यालयात धामधूम! दोन एसपी एकाचवेळी कार्यालयात; खुर्चीसाठी संघर्ष?
जिल्ह्यात पोलिस अधीक्षकपदावर पेच: विश्व पानसरे विरुद्ध निलेश तांबे!

बुलढाणा (बुलडाणा लाईव्ह प्रतिनिधी):
बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात आज सकाळपासूनच तणावपूर्ण घडामोडी सुरू आहेत. जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकपदावर नेमकी कोणाची नियुक्ती झाली आहे, यावरच सध्या संभ्रमाचे वातावरण आहे. एकीकडे कालपर्यंत कार्यरत असलेले एसपी निलेश तांबे अद्याप कार्यालयात कार्यरत असल्याचे दिसत असतानाच, आज सकाळी विश्व पानसरे हे देखील कार्यालयात दाखल झाले आणि त्यांनी एसपीच्या खुर्चीचा ताबा घेतल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे.

या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सध्या दोन एसपी एकाचवेळी कार्यालयात उपस्थित असल्याची अभूतपूर्व स्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्याचे खरे एसपी कोण – निलेश तांबे की विश्व पानसरे – यावर अजून अधिकृत माहिती स्पष्ट झालेली नाही. यामुळे प्रशासनात गोंधळाचे वातावरण आहे, तर पोलीस दलातसुद्धा अस्वस्थता निर्माण झाली आहे.

विशेष म्हणजे, काल मध्यरात्रीपर्यंत निलेश तांबे यांनी नियमितपणे कामकाज पाहिले होते. मात्र आज सकाळी विश्व पानसरे यांनी थेट कार्यालयात हजेरी लावून कार्यभार स्वीकारल्याची चर्चा आहे. अद्यापपर्यंत याबाबत कोणतीही अधिकृत अधिसूचना माध्यमांसमोर आलेली नाही.

हा सारा प्रकार पाहता, जिल्हा पोलीस अधीक्षकपदावर सध्या ‘दोन अधिकारी – एक खुर्ची’ असा संघर्ष पाहायला मिळत आहे. यामुळे सामान्य नागरिक, पोलीस कर्मचारी आणि माध्यमांमध्येही प्रचंड उत्सुकता आणि गोंधळ निर्माण झाला आहे.

आता सरकार किंवा गृह विभागाकडून यावर स्पष्टता येईपर्यंत या पेचप्रसंगाला पूर्णविराम मिळणे कठीण दिसत आहे.

सूचना: या बातमीच्या अचूकतेसाठी जिल्हाधिकारी कार्यालय, गृह विभाग किंवा अधिकृत पोलीस मुख्यालयाकडून पुष्टी होणे आवश्यक आहे.
ब्रेकिंग न्यूज
संभाषणात सामील व्हा
टिप्पणी पोस्ट करा