खामगाव तालुक्यातील पिंपळगाव राजा पीएससी दवाखान्याची अत्यंत दयनीय अवस्था – जनतेला त्रास, प्रशासनाची अनदेखी


पिंपळगाव राजा (ता. खामगाव): आरोग्य ही मूलभूत गरज असूनही खामगाव तालुक्यातील पिंपळगाव राजा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र (PSC) दवाखाना प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अडथळ्यांच्या खाईत सापडला आहे. कोट्यवधी रुपयांचा खर्च करून उभारण्यात आलेल्या या दवाखान्याला गेली चार वर्षे रस्ता व पाण्याची सुविधा मिळालेली नाही, ही बाब अत्यंत गंभीर असून, स्थानिक जनतेमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे.

या दवाखान्याचे बांधकाम तीन वर्षांपूर्वी पूर्ण झाले होते, परंतु केवळ दोन-तीन महिन्यांपूर्वीच दवाखाना प्रत्यक्ष कार्यान्वित करण्यात आला. मात्र, सुरू झाल्यानंतरही येथे आवश्यकतेपेक्षा अधिकारी व कर्मचारी यांची संख्या अत्यंत कमी असल्यामुळे गावकऱ्यांना योग्य आरोग्य सेवा मिळण्यात अडचणी येत आहेत.

समस्या या प्रकारे गंभीर:

1. रस्त्याची पूर्णपणे गैरसोय:
दवाखान्याकडे जाण्यासाठी कोणताही डांबरी किंवा मुरूम रस्ता उपलब्ध नाही. रुग्णांना खडतर मार्गाने चालत जावे लागते. रुग्णवाहिका पोहोचणेही कठीण झाले आहे.


2. पाण्याचा पूर्ण अभाव:
दवाखान्यात पिण्याच्या पाण्याची आणि टॉयलेटसाठी वापराच्या पाण्याची कोणतीही सुविधा उपलब्ध नाही. ही समस्या दैनंदिन कामकाजात अडथळा ठरतेय.


3. कर्मचाऱ्यांची संख्या अत्यंत अपुरी:
जेवढी लोकसंख्या व गरज आहे, त्या मानाने येथे डॉक्टर, नर्सेस व इतर आरोग्य कर्मचारी फारच कमी आहेत. त्यामुळे एकतर वेळेवर उपचार होत नाहीत, किंवा पेशंट्सना खाजगी दवाखान्याचा आधार घ्यावा लागतो.

4. डीएचओ, एसईओ यांच्याकडून अनदेखी:
याकडे अनेक वेळा लक्ष वेधूनही जिल्हा आरोग्य अधिकारी (DHO) व सिव्हिल इंजिनियर ऑफिस (CEO) यांच्याकडून कोणतीही ठोस कृती झालेली नाही. हे संपूर्ण प्रकरण निष्काळजीपणाचे मूर्तिमंत उदाहरण आहे.

स्थानिक जनतेची मागणी:

दवाखान्यापर्यंत तातडीने रस्ता तयार करण्यात यावा

पाण्याची व्यवस्था केली जावी

आवश्यक कर्मचारी नेमण्यात यावेत

आरोग्य सुविधा नियमित व सुरळीत सुरु ठेवण्यात याव्यात

पिंपळगाव राजा येथील नागरिकांनी शासन आणि आरोग्य विभागाकडे तातडीने लक्ष घालण्याची मागणी केली आहे. अन्यथा ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशाराही दिला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या