💥 ‘ऑपरेशन परिवर्तन’ अंतर्गत अवैध गुटखा वाहतूक करणाऱ्यावर मलकापूर ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई! 💥


💥 ‘ऑपरेशन परिवर्तन’ अंतर्गत अवैध गुटखा वाहतूक करणाऱ्यावर मलकापूर ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई! 💥

मलकापूर ग्रामीण (जि. बुलडाणा) – मा. पोलीस अधीक्षक श्री. निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या ‘ऑपरेशन परिवर्तन’ मोहिमेअंतर्गत मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पथकाने अवैधरित्या गुटखा वाहतूक करणाऱ्यावर धडक कारवाई केली आहे.

गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून एका मोटरसायकलवरून मोठ्या प्रमाणात तंबाखूजन्य गुटखा वाहतूक करणाऱ्याला पकडले. या कारवाईत पोलिसांनी एक मोटरसायकल आणि एकूण ₹८७,६४०/- किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

‘ऑपरेशन परिवर्तन’ अंतर्गत जिल्ह्यात अवैध धंद्यांना आळा बसवण्याचे उद्दिष्ट असून, पोलीस अधीक्षकांच्या सूचनांनुसार सर्वच पोलीस ठाण्यांकडून कठोर पावले उचलली जात आहेत. या कारवाईमुळे अवैध गुटखा विक्रेत्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

पुढील तपास मलकापूर ग्रामीण पोलिसांकडून सुरू असून आरोपीविरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.

💪 ‘ऑपरेशन परिवर्तन’ अंतर्गत अशीच कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या