पिंपळगाव राजा येथे ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एमआयएम) पक्षाच्या दारुस सलाम कार्यालयात खामगाव शहर नवनियुक्त शहराध्यक्ष आरिफ पैलवान व रोशन शाह यांचा भव्य सत्कार समारंभ उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाबुद्दीन जमदार यांनी भूषविले.हा सत्कार कार्यक्रम तालुकाध्यक्ष शेख अब्दुल्ला, तालुका उपाध्यक्ष तोफिक ठेकेदार व तालुका सचिव शेख रहीम यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आला होता. यावेळी पक्ष संघटन मजबूत करण्यावर, आगामी काळातील पक्षाची भूमिका तसेच सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांवर आक्रमकपणे आवाज उठवण्याचा निर्धार करण्यात आला.कार्यक्रमात बोलताना नवनियुक्त शहराध्यक्ष आरिफ पैलवान व रोशन शाह यांनी पक्षाने दाखवलेल्या विश्वासाबद्दल आभार व्यक्त केले. आगामी काळात खामगाव शहर व परिसरात एमआयएम पक्ष अधिक मजबूत करून तरुणांना पक्षाशी जोडण्यावर भर देण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.या सत्कार समारंभाला पिंपळगाव राजा शहर व तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. प्रमुख उपस्थितांमध्ये पिंपळगाव राजा शहराध्यक्ष शाबुद्दीन जमदार अशपाक कुरेशी, सचिव मतीन खान, सुजात खान, पी. राजा सचिव सय्यद राजिक, सहसचिव शेख आयुब, सहसचिव शेख फाईन, युवा उपाध्यक्ष शहबाज शेख, रिजवान जमदार, शेख कलीम, फयास कुरेशी, अश्फाक खान रिजवान जामदार यांच्यासह अनेक ज्येष्ठ व युवा कार्यकर्ते उपस्थित होते.कार्यक्रमात उपस्थितांनी एमआयएम पक्षाच्या धोरणांचे समर्थन करत पक्ष अधिक बळकट करण्याचा संकल्प केला. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात व घोषणाबाजीसह पार पडला.
0 टिप्पण्या