पिंपळगाव राजा :
पिंपळगाव राजा परिसरातील पांढरीचे शेत येथे एका नव्याने बांधलेल्या घराच्या जिन्यात १६ वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
मृतकाचे नाव विनायक महादेव राउत (वय १६ वर्ष, जात माळी, रा. वसाडी बु., ता. नांदुरा) असे आहे. याप्रकरणी त्याचा नातेवाईक संतोष बळीराम राउत (वय ३३ वर्ष, कृषीनगर वसाडी, ता. नांदुरा) यांनी खबर दिली आहे.
दि. ०१ जुलै रोजी सायंकाळी ३.१५ वा. पूर्वी हा प्रकार घडला असून फिर्यादी हे MIDC खामगाव येथे काम करून शेताजवळ आले असता त्यांना चुलत भाऊ दिपक राउत याने माहिती दिली की विनायकने पांढरीचे शेतामध्ये बांधलेल्या नव्या घराच्या जिन्यात बल्लीला दोरीने गळफास घेतला आहे.
यावरून पिंपळगाव राजा पोलीस ठाण्यात कायम मर्ग क्र. १८/२०२५, कलम १९४ BNSS २०२३ प्रमाणे नोंद करण्यात आली आहे. घटनास्थळी HC १६३२ संतोष घनोकार (मो. ९७६५०१५४३३) यांनी पंचनामा केला असून तपास ASI ५४ गजानन सातव (मो. ९२८४५३४३५३) यांच्या ताब्यात देण्यात आला आहे.
पोलीस पुढील तपास करीत आहेत.
0 टिप्पण्या