खामगाव (ता. १५ सप्टेंबर) –
खामगाव बायपास ते टेंभूर्णा फाटा (राष्ट्रीय महामार्ग क्र. ०६) या मार्गावर सुरू असलेले डांबरीकरणाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा गंभीर आरोप भीम आर्मी (भारत एकता मिशन), बुलढाणा जिल्हा संघटनेने केला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाध्यक्ष प्रकाश धुंदळे यांच्या नेतृत्वाखाली आज अमरावती येथील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) च्या प्रादेशिक अधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की –
डांबराचा थर नियम व तांत्रिक प्रमाणानुसार टाकण्यात आलेला नाही.
गुणवत्ता नियंत्रणाच्या अटी पाळलेल्या नाहीत.
काही ठिकाणी डांबर आधीच उखडू लागले असून खड्डे पडण्याची शक्यता आहे.
🚧 या निकृष्ट कामामुळे शेकडो वाहनधारकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला असून, सार्वजनिक निधीचा उघडपणे गैरवापर झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
निवेदनातील प्रमुख मागण्या:
🔹 कामाची तातडीने चौकशी करावी.
🔹 ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई करावी.
🔹 कामाची गुणवत्ता मान्यताप्राप्त प्रयोगशाळेत तपासावी व अहवाल सार्वजनिक करावा.
🔹 ठेकेदार व देखरेख करणाऱ्या अधिकाऱ्यांची स्वतंत्र जबाबदारी निश्चित करावी.
भीम आर्मीने इशारा दिला आहे की, जर तातडीने ठोस कारवाई झाली नाही तर खामगाव-अकोला बायपास (नागपूर–मुंबई महामार्ग क्र.०६) येथे रस्ता रोको आंदोलन तसेच NHAI कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडले जाईल. त्यातून उद्भवणाऱ्या परिस्थितीची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची असेल, असा कडक इशारा जिल्हाध्यक्ष प्रकाश धुंदळे यांनी दिला आहे.
0 टिप्पण्या