खामगाव शहर हादरलंजुगनू ढाब्यावर थरारक दुहेरी खून प्रेमकहाणीला रक्तरंजित शेवट


जुगनू ढाब्यावर थरारक दुहेरी खून प्रेमकहाणीला रक्तरंजित शेवट

खामगाव (प्रतिनिधी) :
खामगाव शहरालगतच्या जुगनू ढाब्यावर मंगळवार रात्री उशिरा घडलेल्या धक्कादायक घटनेने परिसर हादरून गेला. प्रेमप्रकरणातून निर्माण झालेल्या वादात तरुण-तरुणीने एकमेकांवर वार केल्याने दोघांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

मृतांमध्ये साहिल ऊर्फ सोनू राजपूत व पायल पवार या दोघांचा समावेश असून ते बुलढाणा जिल्ह्यातील साखरखेर्डा येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, साहिल व पायल मागील अनेक वर्षांपासून प्रेमसंबंधात होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या नात्यात तणाव वाढला होता. सोमवारी रात्री झालेल्या वादातून हा थरारक खून घडल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.

यावेळी घटनास्थळी तिसऱ्या व्यक्तीचीही उपस्थिती असल्याची शक्यता व्यक्त केली जात असून पोलिस या दिशेनेही चौकशी करत आहेत. घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. परिस्थिती तणावपूर्ण होऊ नये म्हणून पोलिसांनी तत्काळ नियंत्रण मिळवत परिसरात बंदोबस्त वाढवला आहे.

या दुहेरी हत्याकांडामुळे खामगाव तालुका हादरून गेला असून प्रेमसंबंधातून शेवटी रक्तपातात समाप्ती झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या