खामगांव तालुक्यातील ७९ ग्रामपंचायतींच्या प्रारूप प्रभाग रचनेची अधिसूचना प्रसिद्ध
खामगांव, दि. ०७ एप्रिल २०२६ (उमाका) — खामगांव तालुक्यातील जानेवारी २०२६ ते डिसेंबर २०२६ या कालावधीत मुदत संपणाऱ्या एकूण ७९ ग्रामपंचायतींच्या प्रारूप प्रभाग रचनेची अधिसूचना आज संबंधित ग्रामपंचायतींमध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे.
या अधिसूचनेमध्ये पिंप्री देशमुख, अडगांव, आंबेटाकळी, आवार, भंडारी, बोथाकाजी, चिंचपूर, ज्ञानगंगापूर, गणेशपूर, गारडगांव, गवंढाळा, घाटपुरी, गोंधनापूर, हिंगणा (का.), हिवरखेड, हिवरा खुर्द, जनुना, काळेगांव, कारेगांव बु., कोलोरी, कुंबेफळ, लाखनवाडा बु., मांडका, पाळा, पारखेड, राहुड, शहापूर, शिरजगांव दे., शिर्ला नेमाने, सुटाळा खुर्द, टेंभुर्णा, उमरा अटाळी, वाडी, वर्णा तसेच अंबिकापूर, अंत्रज, आसा, भालेगांव, बोरजवळा, चितोडा, ढोरपगांव, घाणेगांव, हिवरा बु., जळका भडंग, कदमापूर, कंचनपूर, कंझारा, खोलखेड, लाखनवाडा खुर्द, लांजुड, निमकवळा, निपाणा, पळशी खुर्द, पातोंडा, पिंप्री गवळी, पिंप्री कोरडे, पोरज, रामनगर, संभापूर, शेलोडी, शिराळा, सुजातपूर, सुटाळा बु., टाकळी, वाकुड, दधम, बोरी, पिंपळगाव राजा, निरोड, पिंप्राळा, विहीगांव आदी ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
सदर अधिसूचना परिशिष्ट-६ व नमुना ‘ब’ नुसार प्रसिद्ध करण्यात आली असून, यावर कोणताही आक्षेप किंवा सूचना असल्यास नागरिकांनी दि. १३ एप्रिल २०२६ पर्यंत तहसील कार्यालय, निवडणूक विभाग, खामगांव येथे लेखी स्वरूपात सादर कराव्यात.
प्रशासनाकडून संबंधित ग्रामपंचायत क्षेत्रातील सर्व नागरिकांनी या अधिसूचनेची नोंद घेऊन आवश्यक ती कार्यवाही करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
0 टिप्पण्या