डिजिटल जनगणना 2027 साठी बुलढाणा जिल्हा सज्ज!कागदविरहित प्रक्रियेकडे मोठे पाऊल; प्रशासनाची जोरदार तयारी


बुलढाणा (प्रतिनिधी) – आगामी डिजिटल जनगणना 2027 च्या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्यात प्रशासकीय यंत्रणा पूर्ण क्षमतेने सज्ज झाली असून, यंदाची जनगणना पूर्णपणे कागदविरहित व डिजिटल पद्धतीने पार पाडण्यात येणार आहे. त्यामुळे पारदर्शकता, अचूकता आणि वेग यामध्ये मोठी सुधारणा होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.जिल्हाधिकारी तथा प्रधान जनगणना अधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे यांनी सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, प्रशिक्षणाद्वारे तांत्रिक बाबींचे सखोल ज्ञान आत्मसात करून जनगणनेचे काम अत्यंत अचूक आणि पारदर्शक पद्धतीने पूर्ण करणे आवश्यक आहे.तसेच, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांनी डिजिटल साधनांचा प्रभावी वापर करण्यावर भर देत, आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ही जनगणना यशस्वी करण्याचे आवाहन केले.📊 प्रशिक्षणाची ठळक वैशिष्ट्ये:▪️ 81 फिल्ड ट्रेनर्सना सखोल प्रशिक्षण▪️ 4 मास्टर ट्रेनर्समार्फत मार्गदर्शन▪️ ग्रामीण भागातील येळगाव व शहरी भागातील रामनगर (बुलढाणा) येथे प्रत्यक्ष प्रात्यक्षिकया प्रशिक्षण कार्यक्रमात संजय खडसे, डॉ. रामेश्वर पुरी यांच्यासह अनेक अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.🇮🇳 जनगणना – देशाच्या विकासाचा पाया!जनगणना ही देशाच्या नियोजन आणि विकासासाठी अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे. त्यामुळे सर्वांनी समन्वय आणि जबाबदारीने हे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या