अकोल्यात मोठा धक्का अपर जिल्हाधिकाऱ्यावर गुन्हा ९ दिवसांच्या चौकशीनंतर पोलिसांची थेट कारवाई अकोला जिल्हा प्रशासनात मोठी खळबळ उडवणारी घटना समोर

पब्लिक रिकग्निशन   ब्रेकिंग न्यूज 

अकोल्यात मोठा धक्का
अपर जिल्हाधिकाऱ्यावर गुन्हा  ९ दिवसांच्या चौकशीनंतर पोलिसांची थेट कारवाई
अकोला – जिल्हा प्रशासनात मोठी खळबळ उडवणारी घटना समोर आली आहे. अकोल्याचे अपर जिल्हाधिकारी प्रमोद गायकवाड यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तब्बल ९ दिवस चाललेल्या सखोल चौकशीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
प्राप्त माहितीनुसार, गिट्टी-दगड खाणी सुरू ठेवण्यासाठी खाण मालकांकडून दरमहा १५ हजार रुपयांची कथित खंडणी मागितल्याचा गंभीर आरोप गायकवाड यांच्यावर करण्यात आला आहे. या प्रकरणात एक ऑडिओ क्लिप महत्त्वाचा पुरावा म्हणून समोर आली असून, त्याच्या आधारे पोलिसांनी तपासाची दिशा निश्चित केली.
दरम्यान, संबंधित अधिकाऱ्यांनी सर्व आरोप फेटाळत हे आरोप निराधार असल्याचे सांगितले असून, रॉयल्टी वसुलीच्या कामात गैरसमज निर्माण झाल्याचा दावा केला आहे.
या घटनेमुळे अकोला जिल्ह्यात प्रशासन आणि पोलिस यंत्रणांमध्ये मोठी खळबळ उडाली असून, पुढील तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
#PublicRecognition #AkolaNews #Breaking #CrimeAlert #Maharashtra #MIDC #ExclusiveNews

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या