पोलिसांत तक्रार दिल्यावर ‘तत्काळ कारवाई’ नाही; आता ६ आठवड्यांचे वेटिंग सखोल पडताळणीसाठी शासनाचा मोठा निर्णय





पब्लिक रिकग्निशन
 पोलिसांत तक्रार दिल्यावर ‘तत्काळ कारवाई’ नाही; आता ६ आठवड्यांचे वेटिंग!
सखोल पडताळणीसाठी शासनाचा मोठा निर्णय
 बुलढाणा | प्रतिनिधी
पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिल्यानंतर लगेच गुन्हा दाखल होईल, ही अपेक्षा आता नागरिकांनी ठेवू नये. शासनाने १८ मार्च रोजी घेतलेल्या निर्णयानुसार तक्रार अर्जाच्या पडताळणीसाठी पोलिसांना दिलेली मुदत १४ दिवसांवरून थेट ६ आठवड्यांपर्यंत वाढविण्यात आली आहे. या निर्णयामुळे कार्यवाहीसाठी प्रतीक्षा वाढणार असली तरी तपास अधिक सखोल आणि अचूक होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १७३ अंतर्गत हा निर्णय घेण्यात आला आहे.
 कोणत्या तक्रारींना लागू?
३ ते ७ वर्षे शिक्षेच्या गुन्ह्यांशी संबंधित तक्रारी या निर्णयात समाविष्ट करण्यात आल्या आहेत. यामध्ये फसवणूक, आर्थिक गैरव्यवहार, विश्वासघात आणि आपसातील वाद यांचा समावेश आहे.
 पोलिसांना मिळणार अधिक वेळ
नव्या निर्णयामुळे पोलिसांना पुरावे संकलन, चौकशी आणि सखोल तपासासाठी पुरेसा वेळ मिळणार आहे. त्यामुळे घाईघाईत होणाऱ्या चुकीच्या कारवाया टाळल्या जातील.
 घाईतील गुन्हे दाखल होण्यास आळा
पूर्वी काही वेळा घाईत गुन्हे दाखल झाल्याने अनावश्यक वाद निर्माण होत होते. ही परिस्थिती टाळण्यासाठी शासनाने हा निर्णय घेतला आहे.
 नागरिकांमध्ये संभ्रम
मुदत वाढल्यामुळे नागरिकांमध्ये काही प्रमाणात संभ्रम निर्माण झाला आहे. न्याय मिळण्यास विलंब होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या