बुलढाणा, २० जुलै (प्रतिनिधी) – जिल्ह्यात अवैध दारू विक्रेत्यांविरोधात एलसीबी पथकाने मोठी कारवाई करत धामणगाव बढे येथे सुमारे ६१ हजार रुपयांची देशी-विदेशी दारू जप्त केली आहे.
स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे १९ जुलै रोजी धामणगाव बढे येथे छापा टाकून आरोपीला रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले. या कारवाईत आरोपीकडून देशी व विदेशी दारूचे एकूण १५ बॉक्स जप्त करण्यात आले असून जप्त मुद्देमालाची एकूण किंमत ६१ हजार ६० रुपये इतकी आहे.
याप्रकरणी आरोपीविरुद्ध धामणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलिस अधीक्षक अमोल गायकवाड यांच्या आदेशानुसार एलसीबीचे पोलिस निरीक्षक सुनिल अंबुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय पंकज सपकाळे, हेड कॉन्स्टेबल रघुनाथ जाधव, एजाज खान, दिंगबर कपाटे, पो.कॉ. अजीज परसूवाले, विक्रांत इंगळे व शिवानंद हेलगे यांच्या पथकाने केली.
0 टिप्पण्या