मोठी कारवाई तहसिलदार लाच घेताना रंगेहात अटक!
बुलढाणा (प्रतिनिधी) –
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अकोला घटकाने बुलढाण्यात मोठी कारवाई करत तहसिलदारास लाच घेताना रंगेहात पकडलं आहे.
आरोपीचे नाव श्री. हेमंत भागवत पाटील (वय 44), तहसिलदार, मोताळा असून त्यांनी तक्रारदाराकडून शेतजमीन भोगवटादार वर्ग-२ मधून वर्ग-१ करण्यासाठी रु. २ लाखांची लाच मागितली होती.
तक्रारीवरून पडताळणी केल्यानंतर आज (१४ सप्टेंबर २०२५) आरोपीच्या बुलढाणा शहरातील रामलक्ष्मी नगर येथील घरी सापळा रचण्यात आला. कार्यवाहीदरम्यान तहसिलदार पाटील यांनी पंचासमक्ष रु. २ लाखांची लाच स्वीकारली. त्यानंतर लाच उघडकीस आल्याचे लक्षात येताच त्यांनी रक्कम शौचालयात फेकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी रक्कम जप्त करून आरोपीला ताब्यात घेतलं.
ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक मारुती जगताप, अपर पोलीस अधीक्षक सचिंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक मिलिंदकुमार बहाकर व पोलीस निरीक्षक अतुल इंगोले यांच्या पथकाने केली.
नागरिकांना आवाहन – कुठलाही शासकीय अधिकारी/कर्मचारी लाच मागत असल्यास तात्काळ अँटी करप्शन ब्युरो, अकोला कार्यालयाशी (फोन: ०७२४-२४१५३७०, मोबाईल: ९४०३८०१०६४) संपर्क साधावा.
0 टिप्पण्या