खामगावात धडक कारवाई – रेशनचा तब्बल २२५ क्विंटल तांदूळ घेऊन जाणारा ट्रक जप्तखामगाव (प्रतिनिधी)



 खामगावात धडक कारवाई – रेशनचा तब्बल २२५ क्विंटल तांदूळ घेऊन जाणारा ट्रक जप्त

खामगाव (प्रतिनिधी) –
बुलढाणा जिल्ह्यातील काळ्या बाजारात जाणाऱ्या रेशनच्या तांदळावर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी धडक कारवाई केली आहे. तब्बल २२५ क्विंटल तांदूळ घेऊन जाणारा ट्रक पारखेड फाट्यानजीक पोलिसांच्या पथकाने पकडला. या कारवाईमुळे काळाबाजार करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून तांदुळ काळ्या बाजारात नेण्याचा मोठा डाव उधळून लावण्यात पोलिसांना यश आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की रेशनचा प्रचंड साठा असलेला एक ट्रक बेकायदेशीररीत्या गुजरातच्या दिशेने जात आहे. त्यानुसार आज सकाळी बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पारखेड फाटा परिसरात सापळा रचून थांबले. काही वेळाने तांदुळाने भरलेला ट्रक दिसताच पोलिसांनी त्याला थांबवून तपासणी केली. यावेळी ट्रकमधून रेशनचा तब्बल २२५ क्विंटल तांदूळ आढळून आला.

या प्रकरणी ट्रकचालक मनोज बनुबाई (वय ५३, रा. गुजरात) याला ताब्यात घेण्यात आले असून सदर ट्रक जप्त करून पुढील तपासासाठी खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला आहे.

ही धडक कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पीएसआय पंकज सपकाळ, हेड कॉन्स्टेबल एजाज खान, पोलीस कॉन्स्टेबल अमोल शेजवळ व शिवानंद हेलगे यांनी केली.

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात रेशनच्या तांदळाचा काळाबाजार मोठ्या प्रमाणात होत असल्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. अशा पार्श्वभूमीवर पोलिसांनी उचललेली ही कारवाई सर्वसामान्य जनतेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या