दुसरबीड (प्रतिनिधी)
बिबी पोलिसांच्या दक्ष तपासामुळे ए.एस. पेट्रोलपंपावरील जबरी चोरीत गेलेली रोकड पुन्हा मालकाकडे सुपूर्द करण्यात आली आहे.
१६ ऑक्टोबर २०२४ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास बिबी–सुलतानपूर रोडवरील खापरखेड घुले शिवारात असलेल्या ए.एस. पेट्रोलपंपावर अज्ञात चोरट्यांनी धाड टाकून ७१ हजार ५०० रुपये लंपास केले होते. या प्रकरणी बिबी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार संदीप पाटील, अंमलदार अरुण सानप, नितीन मापारी व रवींद्र बोरे यांनी अल्पावधीतच आरोपीला अटक केली. त्याच्याकडून चोरीस गेलेली रोकड, वापरलेले वाहन आणि हत्यार हस्तगत करण्यात आले. तपास पूर्ण करून आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
न्यायालयाच्या आदेशानुसार व जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या सूचनेनुसार पेट्रोलपंपावरील चोरीस गेलेली रक्कम परत करण्याची प्रक्रिया करण्यात आली. त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या हस्ते पेट्रोलपंप व्यवस्थापक युसुफ शेख यांना ७१ हजार ५५० रुपयांचा धनादेश २५ सप्टेंबर रोजी सुपूर्द करण्यात आला.
0 टिप्पण्या