खामगाव MIDC मध्ये LPG गॅस गळतीचा ‘महा-मॉकड्रिल’ यशस्वी जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती सज्जतेची दमदार चाचणी विविध यंत्रणांचा उत्स्फूर्त सहभागबुलढाणा, दि. 10

जिमाका):औद्योगिक क्षेत्रात उद्भवणाऱ्या भीषण रासायनिक आपत्तींचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी खामगाव MIDC येथे आज एलपीजी गॅस गळती संदर्भात भव्य ‘महा-मॉकड्रिल’ यशस्वीपणे पार पडला. या सरावातून जिल्हा प्रशासनाची तत्परता, समन्वय आणि आपत्ती व्यवस्थापनाची क्षमता अधोरेखित झाली.जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार व निवासी जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ‘वन एशिया नेटवर्क इंडिया प्रा. लि.’ येथे हा सराव आयोजित करण्यात आला. दुपारी ११:३० वाजता टँकर लोडिंग परिसरात गॅस गळती झाल्याचा काल्पनिक प्रसंग निर्माण करण्यात आला.घटनेची माहिती मिळताच कंपनी व्यवस्थापनाने तात्काळ जिल्हा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला. काही मिनिटांतच प्रशासनाची यंत्रणा घटनास्थळी दाखल होऊन बचावकार्याला सुरुवात झाली. अग्निशमन दलाची तत्पर कारवाईअग्निशमन अधिकारी नागेश रोठे यांच्या नेतृत्वाखाली ‘वॉटर कर्टन’ तयार करून हवेत पसरलेला गॅस विरळ करण्यात आला. पोलीस प्रशासनाची कडक नाकेबंदीपोलीस निरीक्षक सुरेंद्र अहेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरात तात्काळ नाकेबंदी करून नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यात आली. महावितरणची तातडीची उपाययोजनासंभाव्य आग टाळण्यासाठी परिसराचा वीजपुरवठा त्वरित खंडित करण्यात आला. कर्मचाऱ्यांचे सुरक्षित स्थलांतरसायरन वाजवून कंपनीतील कर्मचाऱ्यांना आपत्कालीन आराखड्यानुसार सुरक्षित स्थळी हलवण्यात आले.या सरावाचे समन्वय जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संभाजी पवार आणि औद्योगिक सुरक्षा व आरोग्य उपसंचालक अमर पुरुषोत्तम भोगे यांनी केले.यावेळी अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त गजानन घिरके, नायब तहसीलदार सोनाली भाजीभाकरे, महावितरणचे सचिन फेरण, तसेच कंपनीचे जी.एम. राजेश सिन्हा यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकातील गुलाबसिंग राजपूत आणि प्रदीप सोनवणे यांनीही सक्रिय सहभाग नोंदवला. मॉकड्रिलचा मुख्य उद्देशऔद्योगिक क्षेत्रात एलपीजी गळतीसारखी गंभीर परिस्थिती निर्माण झाल्यास विविध यंत्रणांमधील समन्वय, प्रतिसाद वेळ (Response Time) आणि संसाधनांचा प्रभावी वापर तपासणे हा या सरावाचा मुख्य उद्देश होता. सुरक्षिततेबाबत आत्मविश्वास वृद्धिंगतया यशस्वी मॉकड्रिलमुळे खामगाव औद्योगिक परिसरातील सुरक्षिततेबाबत आत्मविश्वास वाढला असून, जिल्हा प्रशासनाच्या कार्यक्षमतेचे सर्वत्र कौतुक होत आहे. सरावाच्या शेवटी ‘वन एशिया नेटवर्क इंडिया प्रा. लि.’च्या वतीने सर्व सहभागी यंत्रणांचे आभार मानण्यात आले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या