नांदुरा (प्रतिनिधी) –
शिवसेना ही केवळ एक राजकीय संघटना नसून मराठी अस्मिता, हिंदुत्व आणि जनतेच्या न्यायहक्कासाठी लढणारा एक बुलंद आवाज आहे. १९ जून १९६६ रोजी वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या स्वाभिमानासाठी स्थापन केलेली ही संघटना आजही त्याच तत्त्वांवर खंबीरपणे उभी आहे. त्या विचारांची मशाल पुढे नेणाऱ्या लाखो शिवसैनिकांमध्ये नवनवीन कार्यकर्त्यांची भर सातत्याने पडत आहे.
याच धर्तीवर, शिवसेनेच्या ५९ व्या वर्धापन दिनानिमित्त नांदुरा येथे एक भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला, ज्यामध्ये शहरप्रमुख अनिल भाऊ जांगळे यांच्या नेतृत्वाखाली तब्बल ३५ युवकांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. या कार्यक्रमात शिवसेनेच्या इतिहासाची, तत्वांची व संघटनेच्या कार्यपद्धतीची माहिती नव्याने सहभागी झालेल्या युवकांना देण्यात आली. सर्व नविन शिवसैनिकांनी शिवसेनेच्या विचारांवर निष्ठा ठेवून समाजहितासाठी कार्य करण्याची शपथ घेतली.
या कार्यक्रमाला युवा शहरप्रमुख हरीश काटले, उपशहरप्रमुख महादेव सपकाळ, शाखाप्रमुख शंभू नालट, सचिन पुंडे, संकेत गुजर, वैभव धुळे, दीपक भटकर, प्रशांत जाधव, मनोज चिम, गोलू कवळे, अक्षय ताकवले, प्रकाश बावस्कार, प्रसाद नेमाडे, श्याम बडवे, आकाश इंगळे, चेतन खडे, अतुल काळे, अंकुश काळे, आनंद सातव, निलेश काळे, विशाल पिसे, अंकुश इंगळे, राजेश ताकवले, राधेश्याम कंठाळे, नितीन सुरळकर, विकास नागलकर, दत्ता सातव, प्रकाश सातव, रवी मात्रे, शुभम इंगळे, अंकुश तायडे, विठ्ठल इंगळे, सुनील तायडे, संतोष कंकाल, शुभम ढवळे यांच्यासह अनेक शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शहरप्रमुख अनिल भाऊ जांगळे यांनी आपल्या भाषणात बाळासाहेबांच्या विचारांचा उल्लेख करत सांगितले की, "शिवसेना ही जनतेसाठी लढणारी, अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारी आणि मराठी माणसाच्या स्वाभिमानासाठी सदैव सज्ज असणारी संघटना आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे देखील कार्य हे जनतेच्या सेवेसाठी असून त्याच तत्वांचा वारसा आपण पुढे चालवत आहोत."
या कार्यक्रमात जोश, उर्जा आणि शिवसेना विचारांनी भारलेले वातावरण होते. नव्या युवा शिवसैनिकांच्या प्रवेशामुळे नांदुरा शहरात शिवसेनेचे बळ अधिकच मजबूत झाले असून, संघटनेच्या भविष्यातील कार्यासाठी हा टप्पा ऐतिहासिक ठरणार असल्याचे मत उपस्थित नेत्यांनी व्यक्त केले.
– प्रतिनिधी
(नांदुरा शिवसेना वृत्त)
0 टिप्पण्या