🟦 बुलढाणा पोलीस दलातील निवृत्त अधिकारी-अंमलदारांचा सन्मान सोहळा संपन्नमा. पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या हस्ते शाल-श्रीफळ व भेटवस्तू प्रदान करून गौरवबुलढाणा (



🟦 बुलढाणा पोलीस दलातील निवृत्त अधिकारी-अंमलदारांचा सन्मान सोहळा संपन्न
मा. पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या हस्ते शाल-श्रीफळ व भेटवस्तू प्रदान करून गौरव

बुलढाणा (प्रतिनिधी) |
बुलढाणा पोलीस दलाच्या आस्थापनेवरून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेल्या पोलीस अधिकारी व अंमलदारांचा सन्मान करण्याचा एक आगळावेगळा उपक्रम पोलीस विभागाच्या वतीने राबविण्यात आला. या कार्यक्रमात मा. पोलीस अधीक्षक श्री. निलेश तांबे यांच्या हस्ते निवृत्त होत असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन त्यांच्या दीर्घकालीन सेवेला आदरांजली वाहण्यात आली.

कार्यक्रमात पोलीस अधीक्षक तांबे यांनी आपल्या मनोगतातून, निवृत्त होणाऱ्या सर्व अधिकारी व अंमलदारांच्या कर्तव्यनिष्ठ सेवेस सलाम करत, त्यांच्या कुटुंबीयांनाही विशेष धन्यवाद दिले. त्यांनी पुढे बोलताना म्हटले की, "पोलीस सेवा ही अत्यंत कठीण आणि जबाबदारीची आहे. वर्षानुवर्षे कर्तव्य पार पाडत अनेक संकटांना तोंड देत आपण सर्वांनी समाजातील कायदा-सुव्यवस्थेसाठी अत्यंत मोलाची भूमिका बजावली आहे."

या कार्यक्रमात जिल्ह्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी, विविध विभागांचे प्रमुख, कर्मचारी तसेच निवृत्त अधिकारी व त्यांच्या परिवारांचे उपस्थित राहून वातावरण अत्यंत भावूक आणि गौरवमय केले.

कार्यक्रमाच्या शेवटी निवृत्त अधिकारी व अंमलदारांनीही आपल्या भावना व्यक्त करत पोलीस दलातील आपली सेवा काळ आठवली. काहींनी डोळ्यातून अश्रू अनावर करत संस्थेप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

हा कार्यक्रम म्हणजे एक सुंदर स्नेहसंमेलनाचा क्षण ठरला, जिथे अनुभव, सन्मान व स्नेह या तिन्हींचा मिलाफ पाहायला मिळाला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या