खामगाव (प्रतिनिधी) : शेतकऱ्यांवरील संकट काही कमी होत नाही. आधीच ओमनी अळीच्या प्रकोपामुळे सोयाबीन पिकाचे प्रचंड नुकसान झालेले असताना, मदत मिळावी या आशेने शेतात गेलेल्या शेतकऱ्यावर नियतीने वेगळेच संकट ओढवले.
दिनांक ७ ऑगस्ट २०२५ रोजी खामगाव तालुक्यातील कंझारा येथील शेतकरी खालिद उल्लाह खान खैरु उल्ला खान हे कृषी सहाय्यक श्री. अवचार साहेब यांच्यासोबत शिवारात सोयाबीन पिकावर झालेल्या ओमनी अळीच्या नुकसानीचे सर्वेक्षण करत होते. पाहणी सुरू असतानाच अचानक रानडुक्कर धावत आले आणि त्यांनी खान यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या घटनेमुळे खान कुटुंबावर दुहेरी संकट कोसळले आहे – एकीकडे शेतीचे प्रचंड नुकसान, तर दुसरीकडे कर्ता पुरुष जखमी. गावकऱ्यांनी प्रशासनाने तातडीने आर्थिक व वैद्यकीय मदत देण्याची मागणी केली आहे.
0 टिप्पण्या