नांदुरा वकील संघाची नवी कार्यकारिणी जाहीर – सुनिल जांगळे अध्यक्षपदीनांदुरा (प्रतिनिधी)



नांदुरा वकील संघाची नवी कार्यकारिणी जाहीर – सुनिल जांगळे अध्यक्षपदी

नांदुरा (प्रतिनिधी) –
नांदुरा वकील संघाची सन 2025-26 ची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून, या कार्यकारिणीत तरुण नेतृत्वाबरोबरच ज्येष्ठांचा अनुभव अशा सुंदर संगमाने संघ अधिक सक्षम होणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.

दिनांक 14 ऑगस्ट 2025 रोजी वकील संघ नांदुराच्या कार्यालयात झालेल्या भव्य बैठकीत सर्व मान्यवर सदस्यांच्या उपस्थितीत नव्या कार्यकारिणीची निवड सर्वानुमते करण्यात आली. या बैठकीत एकमताने ॲड. श्री सुनिल के. जांगळे यांची नांदुरा वकील संघाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली.

तसेच ज्येष्ठ सदस्य ॲड. श्री सदानंद ब्राह्मणे आणि ॲड. श्री राहुल मापारी यांची उपाध्यक्षपदी निवड झाली. ॲड. श्रीकांत देशमुख यांच्याकडे सचिवपदाची धुरा सोपविण्यात आली असून ॲड. सागर पी. जैन यांची कोषाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली. महिला प्रतिनिधित्वाच्या दृष्टीने ॲड. रागिणी केदारे मॅडम सहसचिव पदावर तर ॲड. सुनिल डी. इंगळे सहकोषाध्यक्ष पदी निवडून आले आहेत.

नूतन कार्यकारिणीमध्ये उत्साही तरुण वकीलांचा समावेश करून संघाला नवी ऊर्जा देण्यात आली आहे. यामध्ये ॲड. श्रीराम डी. गावंडे, ॲड. एम. ए. राऊत, ॲड. आसिफ ए. खान, ॲड. नीता खंडारे मॅडम, ॲड. संदेश डी. इंगळे, ॲड. जी. टी. व्यवहारे व ॲड. सागर राठी यांचा कार्यकारिणी सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे.

या महत्त्वपूर्ण बैठकीला नांदुरातील ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. सी. एम. वाघ, ॲड. बी.के. शेख, ॲड. सुनिल बी. इंगळे, ॲड. एस. व्हि. जुनगडे, ॲड. अनिल सातपुतळे, ॲड. विलास नाईक, ॲड. निलेश वेरुळकर, ॲड. अझहर खान, ॲड. अमोल इंगळे, ॲड. आर. बी. सरोदे, ॲड. अभिराज हिवराळे यांसह अनेक मान्यवर वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ज्येष्ठ व अनुभवी वकिलांनी नूतन पदाधिकाऱ्यांचे स्वागत करून त्यांना मार्गदर्शन दिले. यावेळी बोलताना सर्व जेष्ठ सदस्यांनी “संघटनेत एकोपा आणि संघटितपणे काम करण्याची परंपरा कायम ठेवावी. समाजातील न्यायप्रेमी भूमिकेला वकील संघाने सदैव बळ द्यावे” असे आवाहन केले.

बैठकीत उपस्थित सर्व मान्यवरांनी नव्या कार्यकारिणीस हार्दिक शुभेच्छा दिल्या. नूतन कार्यकारिणीच्या निवडीमुळे नांदुरा वकील संघाच्या कामकाजाला अधिक गती आणि दर्जा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या