पिंपळगाव राजा (प्रतिनिधी) –
देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण देशभरात राबविण्यात येत असलेल्या ‘स्वस्थ नारी – सशक्त परिवार अभियाना’ अंतर्गत पिंपळगाव राजा येथे दिनांक २८ सप्टेंबर रोजी प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन जिल्हा व तालुका आरोग्य अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली व भाजपचे ज्येष्ठ नेते मा. पुंडलिक भाऊ बोंबटकार, मा. समाधान भाऊ मुंढे, मा. युवराज भाऊ मोरे तसेच उपसरपंच मा. तेलंग ताई यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.
या शिबिरात नागरिकांच्या आरोग्य तपासणीबरोबरच विविध विभागांच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. डॉ. अनिकेत मेंढे (अस्थीरोग तज्ज्ञ) यांनी रुग्ण तपासणी केली तर स्त्रीरोग, बालरोग, आयुर्वेद चिकित्सा, PMJAY कार्ड नोंदणी, रक्त तपासणी, बी.पी., शुगर, सिकल सेल तपासणी, ईसीजी चाचण्या अशा महत्त्वपूर्ण सेवा नागरिकांना देण्यात आल्या. गरोदर मातांसाठी विशेष समुपदेशन सत्रही घेण्यात आले.
वैद्यकीय अधिकारी डॉ. हफीजा जमाल, डॉ. मानकर, डॉ. ठक, तसेच सर्व CHO, PHC आरोग्य पर्यवेक्षक श्री. मिसाळ, श्रीमती सोळंके, औषध निर्माण अधिकारी, रक्त तपासणी लॅब अधिकारी यांच्यासह आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका, पोषण अभियान पदाधिकारी यांच्या अथक प्रयत्नांमुळे हे शिबिर यशस्वीपणे पार पडले.
या उपक्रमात मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेतला. उपस्थित मान्यवरांनी या मोहिमेद्वारे आरोग्य जनजागृतीचे महत्त्व पटवून सांगत महिलांचे आरोग्य सुदृढ राहिल्यास संपूर्ण कुटुंब आणि समाज निरोगी राहील, असा संदेश दिला.
0 टिप्पण्या