🚨 जळगाव जामोद पोलिसांची मोठी कारवाई – तब्बल ५८४ क्विंटल रेशनचा तांदूळ जप्त 🚨जळगाव जामोद प्रतिनिधी


जळगाव जामोद पोलिसांची मोठी कारवाई – तब्बल ५८४ क्विंटल रेशनचा तांदूळ जप्त 🚨

जळगाव जामोद प्रतिनिधी :
जळगाव जामोद पोलिसांच्या कार्यक्षेत्रात स्थानिक गुन्हे शाखेने २८ सप्टेंबर रोजी केलेल्या धडाकेबाज कारवाईत तब्बल ५८४ क्विंटल सार्वजनिक वितरण प्रणालीचा तांदूळ जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत तब्बल ४२ लाख ९२ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जळगाव-जामोद-नांदुरा रोडवरील पूर्णा नदीवरील नवीन पुलाजवळ नाकाबंदी केली असता, मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार संशयित अशोक लेलँड कंपनीचा ट्रक (क्र. GJ-03CU-2282) अडविण्यात आला. तपासणीदरम्यान ट्रकमध्ये २४० क्विंटल रेशन तांदूळ आढळला.

पुढील तपासात सदर ट्रक कुरणगाड येथून आला असल्याचे समजताच पथकाने पोलीस स्टेशनला ट्रक लावून तात्काळ गाठ घातली आणि गोडावूनवर छापा टाकला. तेथे तब्बल ३४४ क्विंटल तांदूळ साठवलेला आढळून आला. पुरवठा निरीक्षकांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला.

दोन्ही ठिकाणी मिळून जप्त केलेला तांदूळ ५८४ क्विंटल इतका असून त्याची बाजारभावानुसार किंमत १७ लाख ५२ हजार रुपये आहे. त्याचबरोबर जुन्या वापरत्या अशोक लेलँड ट्रकची किंमत २५ लाख असल्याने एकूण मुद्देमालाची किंमत ४२ लाख ९२ हजार २०० इतकी झाली आहे.

या प्रकरणी ट्रकचालक भट्टी कादर कासम (५५, रा. अरब शेरी, राजकोट, गुजरात), तसेच कुरणगाड येथील वैभव सुनील आटोळे (२५) व अंकुश आटोळे (२३) या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सुरू आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या