बुलढाण्यात धडाकेबाज गुटखा कारवाई१.४३ कोटींचा मुद्देमाल जप्त – ३ आरोपी अटकेत

 बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात मोठी गुटखा कारवाई ! 🚨

मेहकर हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेचा धडाकेबाज सापळा – तब्बल 1.43 कोटींचा गुटखा व 2 ट्रक जप्त – 3 आरोपी अटकेत

बुलढाणा, दि. ३० (प्रतिनिधी)
महाराष्ट्र शासनाने प्रतिबंध केलेल्या व मानवी आरोग्यास अत्यंत घातक ठरणाऱ्या गुटखा व सुगंधीत पान मसाला विक्री करणाऱ्यांवर बुलढाणा पोलिसांनी धडाकेबाज कारवाई केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मेहकर पोलीस ठाण्याच्या हद्दीत समृद्धी महामार्गावर दोन ट्रक पकडून तब्बल १ कोटी ४३ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत ३ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

गुप्त माहितीवर सापळा

दि. ३० सप्टेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेला गुप्त माहिती मिळाली की, अमरावती येथून मुंबईकडे जाणारे दोन ट्रक बेकायदेशीर गुटखा घेऊन निघाले आहेत. या माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक मा. निलेश तांबे यांच्या आदेशाने व अपर पोलीस अधीक्षक श्री. अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. सुनिल अंबुलकर यांच्या नेतृत्वात पथकाने फर्दापूर टोल नाक्यावर सापळा रचला.

अखेरीस संशयित अशोक लेलैंड कंपनीचे दोन ट्रक थांबवून तपासले असता आत मोठ्या प्रमाणात गुटखा व सुगंधीत पान मसाला आढळून आला.

हस्तगत मुद्देमाल

1. गुटखा – २६४ पोते, किंमत १,१३,०९,७६०/- रुपये


2. अशोक लेलैंड कंपनीचे २ ट्रक, किंमत ३०,००,०००/- रुपये
एकूण हस्तगत मुद्देमाल – १,४३,०९,७६०/- रुपये

अटक आरोपींची नावे

1. मोहम्मद इम्रान मोह. हफिज (२८ वर्षे), रा. अचलपूर, जि. अमरावती

2. अजीम बेग हाफिज बेग (३६ वर्षे), रा. अन्सारनगर, अमरावती

3. एजाज अहमद अजीज अहमद (३१ वर्षे), रा. शिरजगाव, ता. चांदूरबाजार, जि. अमरावती

वरील आरोपींविरुद्ध भा.दं.सं. कलम २७४, २७५, २२३, १२३ सह अन्न सुरक्षा मानके कायदा २००६ चे कलम २६, २७, ५९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास मेहकर पोलीस करीत आहेत.

वरिष्ठांचे आदेश व अधिकाऱ्यांची कामगिरी

ही भव्य कारवाई मा. निलेश तांबे, पोलीस अधीक्षक बुलढाणा यांच्या आदेशाने व श्री. अमोल गायकवाड, अपर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि. सुनिल अंबुलकर यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक प्रताप बाजड, अविनाश जायभाये, शरद गिरी, दिपक लेकुरवाळे, पुरुषोत्तम आघाव, गणेश पाटील, निलेश राजपूत, पूजा जाधव, समाधान टेकाळे यांच्यासह संपूर्ण पथकाने धाडसी कारवाई केली.

जिल्ह्यातील सर्वात मोठी कामगिरी

गुटखा विक्री व वाहतूक रोखण्यासाठी बुलढाणा पोलीस कटिबद्ध असून, जिल्ह्यातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी गुटखा कारवाई मानली जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या