स्थानिक गुन्हे शाखा बुलढाण्याची धडाकेबाज कारवाई – मुद्देमालासह अटक
बुलढाणा (प्रतिनिधी) –
जिल्ह्यातील हिवरखेड पोलीस ठाणे हद्दीत हातचलाखीने सोन्याचे दागिने लुबाडणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखा, बुलढाणा यांच्या पथकाने अटक करून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईदरम्यान पोलिसांनी आरोपींकडून सोन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून नागरिकांमध्ये दिलासा व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हिवरखेड परिसरात काही दिवसांपासून हातचलाखी करून महिलांना फसवून दागिने लुबाडण्याच्या घटना वाढल्या होत्या. त्याची गंभीर दखल घेत स्थानिक गुन्हे शाखेने गुप्त माहितीच्या आधारे पथक रवाना केले. अखेर दोन संशयितांना सापळा रचून पकडण्यात यश आले.
आरोपींवर हिवरखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांची चौकशी सुरू आहे. या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दाखवलेल्या तत्परतेचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.
0 टिप्पण्या